मन करूनियां सावध । वाचे स्मरे तूं गोविंद
man karuniyan savadh | vache smare tun govind
मन करूनियां सावध । वाचे स्मरे तूं गोविंद ॥१॥ तेणें साधे सर्व काज । सकळ साधनांचें निज ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
man karuniyan savadh | vache smare tun govind
मन करूनियां सावध । वाचे स्मरे तूं गोविंद ॥१॥ तेणें साधे सर्व काज । सकळ साधनांचें निज ॥२॥
man karuniyan sthir | hrudayin dhyai to sachar
मन करूनियां स्थिर । हृदयीं ध्याई तो साचार ॥१॥ मग सुखाची वसती । सदा समाधान चित्तीं ॥२॥
man manasi hoy prasanna | tevhan vrutti hoy nirabhiman
मन मनासी होय प्रसन्न । तेव्हां वृत्ति होय निरभिमान ॥१॥ पावोनि गुरुकृपेची गोडी । मना मन उभवी गुढी ॥२॥
man majhen lago sopanacharanin | mastak hen dhani payanvari
मन माझें लागो सोपानचरणीं । मस्तक हें धणी पायांवरी ॥१॥ सोपान सोपान जपेन हें नाम । अन्य न करीं नेम दुजा कांहीं ॥२॥
man majhen vedhalen man majhen vedhalen | pahatan bhalen sachchidanand
मन माझें वेधलें मन माझें वेधलें । पहातां भलें सच्चिदानंद ॥१॥ आनंदीआनंद मनासी पैं झाला । देखिला सांवळा पाडुरंग ॥२॥
man ramin rangalen avaghen manachi ram jalen | sabahma abhyantarin avaghen ramarup kondalen ||dhru
मन रामीं रंगलें अवघें मनचि राम जालें । सबाह्म अभ्यंतरीं अवघें रामरुप कोंदलें ॥ध्रु०॥ चित्तचि हारपले अवघें चैतन्यचि जालें । देखतां देखतां अवघें विश्वा मावळलें ।
man hen odhal | sada kari talamal
मन हें ओढाळ । सदा करी तळमळ ॥१॥ तयालागीं स्थिर करीं । चित्तीं महादेव धरी ॥२॥
manamohan muralivala | nandacha alabela
मनमोहन मुरलीवाला । नंदाचा अलबेला ॥१॥ भक्तासाठीं तो जगजेठी । कुब्जेसी रत जाला ॥२॥
mana aik ek mat | dharin harinamin het
मना ऐक एक मात । धरीं हरिनामीं हेत ॥१॥ तेणें चुकती बंधन । वाचे म्हणे नारायण ॥२॥
mana aik he vinanti | tun na kari duji khanti | viththalavanchuni priti | duji nako anik
मना ऐक हे विनंती । तूं न करी दुजी खंती । विठ्ठलावांचुनी प्रीती । दुजी नको आणिक ॥१॥ वाउगा तूं न करी सोस । दृढ घालीं तूं कास । धरीं पां विश्वास । विठ्ठलचरणीं ॥२॥
mana tun adhir adhir | bahu pataki pamar | na rahasi sthir | kshanabhar nishchayen
मना तुं अधीर अधीर । बहु पातकी पामर । न राहासी स्थिर । क्षणभर निश्चयें ॥१॥ किती शिकवावें तूंतें । नायकसी एक चिंत्तें । बहु गुणें बोलतां तूंतें । नायकसी पामरा ॥२॥
mana tun param chandal | adham khalahunin khal | vishayin talamal | bah karasi papishtha
मना तुं परम चांडाळ । अधम खळाहुनीं खळ । विषयीं तळमळ । बह् करसी पापिष्ठा ॥१॥ धरीं विठ्ठलीं विश्वारी । आणिक नको रे सायास । वाउगा तो सोस । सांडीं सांडी अधमा ॥२॥
mana tun ek karin | vache athavi shrihari
मना तूं एक करीं । वाचे आठवी श्रीहरी ॥१॥ आणिक न करी साधन । वाचे म्हणे नारायण ॥२॥
mana tun ek majhi mat | shriviththali na dhari kan ren het
मना तूं एक माझी मात । श्रीविठ्ठली न धरी कां रें हेत ॥१॥ कांहीं पडतां जड भारी । वाचे म्हणे विठठल हरी ॥२॥
mana dujin buddhi nako ba hi | santasamagamin rahi | yaparaten kanhin | dujen nako sarvatha
मना दुजीं बुद्धि नको बा ही । संतसमागमीं राही । यापरतें कांहीं । दुजें नको सर्वथा ॥१॥ मीपणाचा ठावो । टाकीं हा संदेहो । पडसी प्रवाहो । वाउगाची शिणसी ॥२॥
mana nako nako hindon darodarin | kashta jhale bhari yetan jatan
मना नको नको हिंडों दारोदारीं । कष्ट झाले भारी येतां जातां ॥१॥ कल्पना सोडोनि संतासंगें राहें । सर्व सुख आहे त्यांचे पायीं ॥२॥
mana nishchay tun kari | mhane jain pandhari
मना निश्चय तूं करी । म्हणे जाईन पंढरी ॥१॥ नेमधर्मक हाचि माझा । पंढरीवांचूनि नाहीं दुजा ॥२॥
mana sandin vishayakhodi | lavin viththaleshin godi
मना सांडीं विषयखोडी । लावीं विठ्ठलेशीं गोडी ॥१॥ आणिक न लगे साधन । एकलें मन करी उन्मन ॥२॥
manacha savistar | aika tumhin vo nirdhar
मनाचा सविस्तार । ऐका तुम्हीं वो निर्धार ॥१॥ मनें केलें सगुण निर्गुण । मनें दाखविलें चैतन्य ॥२॥
manachi to khutalin gati | sant sangati ghadatanchi
मनाची तो खुटलीं गती । संत संगती घडतांचि ॥१॥ बहु जन्मांचा तो लाग । फीटला पांग जन्मोजन्मीं ॥२॥