भजनी मालिका
← भजनांकडे परत

मना ऐक हे विनंती । तूं न करी दुजी खंती । विठ्ठलावांचुनी प्रीती । दुजी नको आणिक

mana aik he vinanti | tun na kari duji khanti | viththalavanchuni priti | duji nako anik

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मना ऐक हे विनंती । तूं न करी दुजी खंती । विठ्ठलावांचुनी प्रीती । दुजी नको आणिक ॥१॥ वाउगा तूं न करी सोस । दृढ घालीं तूं कास । धरीं पां विश्वास । विठ्ठलचरणीं ॥२॥ सांडीं माझें आणि तुझें । वाउगें नको वाहुं वौझें । निपजती बीजें । संतचरणी सकळ ॥३॥ हेंचि साधनांचें सार । विठ्ठलमंत्र उच्चार । एका जनार्दनीं वेरझार । येणें तुटें समूळ ॥४॥