भजनी मालिका
← भजनांकडे परत

मना दुजीं बुद्धि नको बा ही । संतसमागमीं राही । यापरतें कांहीं । दुजें नको सर्वथा

mana dujin buddhi nako ba hi | santasamagamin rahi | yaparaten kanhin | dujen nako sarvatha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मना दुजीं बुद्धि नको बा ही । संतसमागमीं राही । यापरतें कांहीं । दुजें नको सर्वथा ॥१॥ मीपणाचा ठावो । टाकीं हा संदेहो । पडसी प्रवाहो । वाउगाची शिणसी ॥२॥ बहुत मतमतांतरे । कासया शिणसी रे आदरें । संतचरणीं झुरे । रात्रंदिवस मानसीं ॥३॥ कायिक वाचिक सर्वथा । भजे भजे पंढरीनाथा । एका जनार्दनीं तत्त्वतां । संतचरणीं लीन होय ॥४॥