भजनी मालिका
संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर

तेराव्या शतकातील संत-कवी; ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचे कर्ते.

संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर मराठीत ज्ञानेश्वरी ही टीका लिहिली. वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतांमध्ये त्यांचे स्थान अग्रगण्य आहे. आळंदी येथे त्यांची संजीवन समाधी आहे.

या संतांची भजने

देव आहे जैसा तैसा नेणवे सहसा । भांबावला कैसा विश्वजनु ॥ तया रुप ना रेखा लय ना लक्षण । ते प्रतिमें आणून वासना रुपें ॥१॥

देवा तुज नेणतांना कांहीं न सांभाळितां नाना याति धरुनि धांविन्नलों । धांवतां धांवतां पुढेण सुनाट देखिलें त्याचि पाउलीं मागुतां मुरुडलोंजी सुंदरा ॥१॥

दोन्ही बाहीं संतांची सभा । सिंहासनी उभा श्रीविठ्ठल ॥१॥ गाती नारद तुंबर प्रेमें । हरीचें नाम गर्जती ॥२॥