भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहाचेनि दीपकें पाहे जों सभोंवतें

dehacheni dipaken pahe jon sabhonvaten

देहाचेनि दीपकें पाहे जों सभोंवतें । तंव अवचितेंची ध्यान केलें ॥१॥ निराकारींची वस्तु आकारा आणिली । कृष्णी कृष्ण केली सकळ सृष्टी ॥२॥ लय गेलें ध्यानीं ध्यान गेलें उन्मनी । नित्य हरिपर्वणी सर्वांरुपें ॥३॥ आनंद सोहळा हरिरुपीं आवडी । कृष्ण अर्धघडी न सोडी आम्हां ॥४॥ बापरखुमादेविवरविठ्ठल अभय । भयांचें पैं भय हरपे कृष्णीं ॥५॥