भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव आहे जैसा तैसा नेणवे सहसा । भांबावला कैसा विश्वजनु

dev ahe jaisa taisa nenave sahasa | bhambavala kaisa vishvajanu

देव आहे जैसा तैसा नेणवे सहसा । भांबावला कैसा विश्वजनु ॥ तया रुप ना रेखा लय ना लक्षण । ते प्रतिमें आणून वासना रुपें ॥१॥ देखा सर्वगत निराळा अद्वैत । तया मूर्तिमंत ध्याय जनु ॥ तिहीं देवासि आरु जेथुनि विस्तारु । तो ध्वनि ओंकारु त्या आरु । आतां तो नाद ना बिंदु काळा ना छंदु । अक्षय परमानंदु सदोदितु ॥२॥ अवतरे तैसाच नव्हे होय तें न संभवे । आहे तें आघवें लाघव रया ॥ तो येकट एकला रचला न वेचला । आदिअंतीं संचला अनंतपणें ॥ पृथ्वी आप तेज वायु आकाश । हीं सकळही हारपती प्रळयांती ॥ तो निरशून्य निरुपम निरंजन निर्वाण । ते दशा पाषाण केंवि पावती ॥३॥ पाहातां या डोळां परि न दिसे कांहीं केल्या । व्यापुनियां ठेला बाहिजु भीतरि ॥ तो पदपिंडा अतीतु भवभावरहितु । बापरखुमादेविवर विठ्ठलु ह्रदयांतु रया ॥४॥