भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाविण शून्य मुख

devavin shunya mukh

देवाविण शून्य मुख । नाम न घेतां नाहीं सुख । अंतीं होईल रे दु:ख । नाम नसतां मुखीं ॥१॥ राम कृष्ण गोविंद । हरि माधव परमानंद । नित्य ऐसा जयासि छंद । तोचि सुलभ गर्भवासीं ॥२॥ अनंत नाम निरसून । एक मार्ग तोचि मान्य तेणें जोडे नित्य सौजन्य । तोचि रामकृष्ण उच्चारी ॥३॥ ज्ञानदेवें अनुमानलें । मग भक्तिसुख साधलें । रामकृष्ण उच्चारिलें । जें तारक तिहीं लोकीं ॥४॥