भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह दंडुनि पाईक अनुसरसा जीवें

deh danduni paik anusarasa jiven

देह दंडुनि पाईक अनुसरसा जीवें । तव स्वामियाचें गूज हातासि आलें ॥१॥ पाईकपण गेलें स्वामि होऊनि ठेले । परि नाहीं विसरलें स्वामियातें ॥२॥ पाईकपणें ऐसा आठवुचि नांहीं । स्वामीवांचुनि कांही जाणेचिना ॥३॥ बापरखुमादेविवरु विठोजी उदारु । पाईक वो साचारु स्वामी केला ॥४॥