भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखोनि हांव बांधे तें तंव नाहीं होयें

dekhoni hanv bandhe ten tanv nahin hoyen

देखोनि हांव बांधे तें तंव नाहीं होयें । आहें ते केही न जाये बापा । असें तें दिसों नये नाहीं तें घेवों थोर काजेविण विटंबिलें कैसें रया ॥१॥ शिव शिव लटिकेचि शिणले । येणें लटिकेंनि बहु श्रमविलें । साच तें लटिकें लटिकें तें सांच लिंगा हे खूण जाण रया ॥२॥ आपुली प्रतिष्ठा पूज्य जे होती । ईही गुणीं आम्हा उपहति बापा । मनाचा फाळका फाटुनि केला बाउला । तोचि तो खेळवूं किती रया ॥३॥ आपुलें युक्तीचे वाति वेर्‍ही गिवसीतां त्या पदार्थाचे पोटीं लपती रया । तें सांडूनियां अभिप्रायाचे बळ निजतत्त्वीं तें केवीं निवती रया ॥४॥ निज लाळा लिंपोनि जुन्या अस्थि श्वान चघळूनि करितसे कोड रया ॥५॥ हाता पायांचा निखळ स्त्रीपुरुषांचा येक मेळ । देह ऐसा यातें म्हणती बापा आपणपै जगा प्रतीति मानव हें तंव चिळसवाणें रया ॥६॥ मायबापें आडनावें त्यांचिया वोसंगा । निघों म्हणों तरि आपुलिये साउलिये कां न बैसावें रया ॥७॥ प्रजाचे पोसिलें पुढें पाइकाचें रक्षिलें । इंद्रियांचें वोळगणें तें काळाचे खेळणें । जगीं राय बोलिजति आतां गोसावी कवणातें म्हणावें रया ॥८॥ मृगजळ तंव मृगजळींच भरतें देखोनि धांवणें तंव सीणणें । या परि झणी करिसि सदाशिवा जगा प्रतीति पावउनि झकणें रया ॥९॥ आतां असो हा बोलु तूं एक गोसावी साच येतुलेनि आम्हां उजरी कोटि स्वप्न ऐक चेईलिया कैचें ज्ञानदेव म्हणे ऐसें करी रया ॥१०॥.