भजनी मालिका

भजने

इंद्रिये नाना छळती पामरें । समाधान शरीरें नोहे कधीं ॥१॥ त्याचा जो व्यापार करती सैरावैरा । परि त्या सर्वेश्वरा न भजती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

इलुसाचि प्रपंच परि हा लटिकाअ । तेणें तुज व्यापका झांकियलें ॥१॥ ऐसियाचा मज घालोनियां खेवा । स्वामिद्रोहि देवा करिसी मज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

इष्ट मित्र बंधु चुलते पुतणे । काळाचे पोसणें सर्व देख ॥१॥ यमाची यातना पडतां जीवा ती । कोणा काकुलती करसी मूढा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

इहलोकीं आम्हां भूषण अवकळा । भोपळा वाकळा आणि भिक्षा ॥१॥ निमोली संपदा भयविरहित । सर्वकाळ चित्त समाधान ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

इहलोकीं आम्हां वस्तीचें पेणें । उदासीन तेणें देहभावीं॥१॥ कार्यापुरतें कारण मारगीं । उलंघूनि वेगीं जावें स्थळा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

इहलोकीं बरा तो परलोकीं वंद्य । त्यासी भेदत्व निंद्य उरलें नाहीं ॥१॥ परस्त्री देखतां नपुंसक वागे । परधन पाहतां अंधापरी निघे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

इहीं श्रवणीं तुझें गुणगान ऐकेन । इहीं चरणीं तीर्थपथेम चालेन । नाशिवंत देह कवणीये काजा । ऐसी प्रेमभक्ति देई सहजा ॥१॥

रचनाकार: संत भानुदास

ईश्वरा नियंता निगुण । नाम रुप जया नाहीं वर्ण । विदया अविदयातीत चिदधन । आपणा जो आपण्‍ गुरुशिष्य ॥१॥ नातळोनि महदहंकार मायेसी । सहजचि गुणतीत तो अनायासीं । होणें निमणें नाहीं ज्यासी । आपण आपणासी कदा न देखे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उकिरडा आधीं अंगीं नरकाडी । जातीची ते जोडी ते चि चित्तीं ॥१॥ कासयानें देखे अंधळा माणिकें । चवीविण फिके वांयां जाय ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उखतें आयुष्य जायांचें कलेवर । अवघें वोडंबर विषयांचें ॥१॥ कोणासी हा लागे पुसणें विचार । मनें चि सादर करूं आतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उगमापासुनी गंगा सागरासी गेली । काय दोन जालीं उदकें त्यांची ॥१॥ तैसा ज्ञानदेव जाला अनुभव । काय आम्हां देव दुरावला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव