भजनी मालिका
← भजनांकडे परत

ईंद्रासी उद्वेग सर्वकाळ मनीं

indrasi udveg sarvakal manin

रचनाकार: संत रामदास · अभंग
ईंद्रासी उद्वेग सर्वकाळ मनीं । माझे राज्य कोणी घेईना कीं घेईना कीं कोणी बळिया दानव । घालिना कीं देव कारागृहीं कारागृह देवादिकांचे चुकेना । तेथे काय जनां चुकईल चुकईल भोग हें कईं घडावें । लागेल भोगावें केलें कर्म केले कर्म तुटे जरी भ्रांति फिटे । दास म्हणे भेटे संतजन।