भजनी मालिका
← भजनांकडे परत

इहलोकीं आम्हां भूषण अवकळा । भोपळा वाकळा आणि भिक्षा

ihalokin amhan bhushan avakala | bhopala vakala ani bhiksha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
इहलोकीं आम्हां भूषण अवकळा । भोपळा वाकळा आणि भिक्षा ॥१॥ निमोली संपदा भयविरहित । सर्वकाळ चित्त समाधान ॥ध्रु.॥ छिद्राचा आश्रम उंदीरकुळवाडी । धन नाम जोडी देवाची तें ॥२॥ तुका म्हणे एक सेवटीं राहाणें । वर्ततों या जना विरहित ॥३॥