भजनी मालिका
← भजनांकडे परत

उकिरडा आधीं अंगीं नरकाडी । जातीची ते जोडी ते चि चित्तीं

ukirada adhin angin narakadi | jatichi te jodi te chi chittin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उकिरडा आधीं अंगीं नरकाडी । जातीची ते जोडी ते चि चित्तीं ॥१॥ कासयानें देखे अंधळा माणिकें । चवीविण फिके वांयां जाय ॥ध्रु.॥ काय जाणे विष पालटों उपचारें । मुर्खासी अंतर तों चि बरें ॥२॥ तुका म्हणे काय उपदेश वेड्या । संगें होतो रेड्यासवें कष्ट ॥३॥