भजनी मालिका
← भजनांकडे परत

इहलोकींचा हा देह । देव इच्छिताती पाहें

ihalokincha ha deh | dev ichchhitati pahen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
इहलोकींचा हा देह । देव इच्छिताती पाहें ॥१॥ धन्य आम्ही जन्मा आलों । दास विठोबाचे झालों ॥ध्रु.॥ आयुष्याच्या या साधनें । सच्चिदानंद पदवी घेणें ॥२॥ तुका म्हणे पावठणी । करूं स्वर्गाची निशाणी ॥३॥