भजनी मालिका
← भजनांकडे परत

उगमापासुनी गंगा सागरासी गेली । काय दोन जालीं उदकें त्यांची

ugamapasuni ganga sagarasi geli | kay don jalin udaken tyanchi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उगमापासुनी गंगा सागरासी गेली । काय दोन जालीं उदकें त्यांची ॥१॥ तैसा ज्ञानदेव जाला अनुभव । काय आम्हां देव दुरावला ॥२॥ सरिता सरोवरचे एके ठायीं झरे । लहान थोर सारे स्वरुपीं माझ्या ॥३॥ रुक्मादेवीवरें उगविलें गाबाळ । संत कृपाळ डुल्लाताती ॥४॥ नामा म्हणे येणें मोहिलें चित्त । राहिले तटस्थ चौघेंजण ॥५॥