भजनी मालिका

भजने

हृदयस्थ अत्माराम नैणती । मूर्ख ते फिरती तीर्थाटणी ॥१॥ काय त्या भ्रंती पुडलीसे जीवा । देवाधिदेवा विसरती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हृदयस्थ असोनी कां रे फिरसी वायां । दीप आणि छाया जयापरी ॥१॥ आत्मतीर्थी सुस्नात झालिया मन । आणिक साधन दुजें नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हृदयस्थ जया नाहीं ठावा देव । पूजा करती वाव सर्वभावें ॥१॥ जाणावा अंतरीं मानावा हृदयीं । पहावा सर्वांतरीं परमात्मा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हृदयीं नांदें संदेह मूळ । तेथें फळ विरुढें केंवी ॥१॥ जैसें बीज तैसा अंकुर । दिसे निर्धार जाणावा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हृदयीं परमात्मा नांदे परिपुर्ण । तो शिव सनातन पूर्णब्रह्मा ॥१॥ जीव तो गुंतला विषयाचे लक्षीं । शिव सर्वसाक्षीं परब्रह्मा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हृदयींच स्नान हृदयींच ध्यान । हृदयींच भजन सर्वकाळ ॥१॥ हृदयींच दान हृदयींच धर्म । ह्रुदयींच नेम सर्व जोडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हृदयींचे देव हृदयींच भक्त । हृदयींच होत पूजा सर्व ॥१॥ ह्रुदयींच ध्यान हृदयीं जें मन । हृदयीं तें आसन देव वसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हें गे आयुष्य हातोहातीं गेलें । आंगीं आदळलें जन्म-मरण ॥१॥ कांरे निजसुरा दैवहत मना । आपुली सूचना न करिसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हे चि अनुवाद सदा सर्वकाळ । करुनियां गोपाळकाला सेवूं ॥१॥ वोरसलें कामधेनूचें दुभतें । संपूर्ण आइतें गगनभरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हे चि थोर भक्ती आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥ ठेविलें अनंतें तैसें चि राह वें । चित्तीं असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हें चि भवरोगाचें औषध । जन्म जरा तुटे व्याध । आणीक कांहीं नव्हे बाध । करील वध षड्वर्गा ॥१॥ सांवळें रूप ल्यावें डोळां । सा चौ अठरांचा गोळा । पदर लागों नेदी खळा । नाममंत्रमाळा विष्णुसहस्र ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हे चि भेटी साच रूपाचा आठव । विसावला जीव आवडीपै ॥१॥ सुखाचें भातुकें करावें जतन । सेविल्या ताहान भूक जाय ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हें चि माझें तप हें चि माझें दान । हें चि अनुष्ठान नाम तुझें ॥१॥ हें चि माझें तीर्थ हें चि माझें व्रत । सत्य हें सुकृत नाम तुझें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हें चि याच्या ऐसें मागावें दान । वंदूनि चरण नारायणा ॥१॥ धीर उदारीं व निर्मळ निर्मत्सर । येणें सर्वेश्वर ऐसें नांव ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम