भजनी मालिका
← भजनांकडे परत

हृदयस्थ असोनी कां रे फिरसी वायां । दीप आणि छाया जयापरी

hrudayastha asoni kan re phirasi vayan | dip ani chhaya jayapari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हृदयस्थ असोनी कां रे फिरसी वायां । दीप आणि छाया जयापरी ॥१॥ आत्मतीर्थी सुस्नात झालिया मन । आणिक साधन दुजें नाहीं ॥२॥ साधन तें मन करी आपुलें आधीन । यापरतें कारण आन नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं मनासी आवरी । मग तुं संसारीं धन्य होसी ॥४॥