भजनी मालिका
← भजनांकडे परत

हृदयींचे देव हृदयींच भक्त । हृदयींच होत पूजा सर्व

hrudayinche dev hrudayinch bhakta | hrudayinch hot puja sarva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हृदयींचे देव हृदयींच भक्त । हृदयींच होत पूजा सर्व ॥१॥ ह्रुदयींच ध्यान हृदयीं जें मन । हृदयीं तें आसन देव वसे ॥२॥ ह्रुदयीं ते भुक्ति ह्रुदयीं ते मुक्ति । हृदयीं सर्वस्थिती देव जाणों ॥३॥ एका जनार्दनीं हृदयींच पाहाल । तें सुख घ्याल हृदयामाजीं ॥४॥