भजनी मालिका
← भजनांकडे परत

हृदयीं नांदें संदेह मूळ । तेथें फळ विरुढें केंवी

hrudayin nanden sandeh mul | tethen phal virudhen kenvi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हृदयीं नांदें संदेह मूळ । तेथें फळ विरुढें केंवी ॥१॥ जैसें बीज तैसा अंकुर । दिसे निर्धार जाणावा ॥२॥ योगयाग शास्त्रपाठें । वाउगी खटपटे तर्काची ॥३॥ करितां कर्म धर्म नेहटी । नोहे भेटी संतांची ॥४॥ एका जनार्दनीं त्याचा दास । सहज आस पुरतसे ॥५॥