भजनी मालिका
← भजनांकडे परत

हें चि माझे धन । तुमचे वंदावे चरण

hen chi majhe dhan | tumache vandave charan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हें चि माझे धन । तुमचे वंदावे चरण ॥१॥ येणें भाग्यें असों जीत । एवढें समर्पूनी चित्त ॥ध्रु.॥ सांभाळिलें देवा । मज अनाथा जी जीवा ॥२॥ जोडूनियां कर । तुका विनवितो किंकर ॥३॥