भजनी मालिका
← भजनांकडे परत

हे चि थोर भक्ती आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची

he chi thor bhakti avadati deva | sankalpavi maya sansarachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हे चि थोर भक्ती आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥ ठेविलें अनंतें तैसें चि राह वें । चित्तीं असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥ वाहिल्या उद्वेग दुःख चि केवळ । भोगणें तें फळ संचिताचें ॥२॥ तुका म्हणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवा पायीं ॥३॥