भजनी मालिका
← भजनांकडे परत

हें चि माझें तप हें चि माझें दान । हें चि अनुष्ठान नाम तुझें

hen chi majhen tap hen chi majhen dan | hen chi anushthan nam tujhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हें चि माझें तप हें चि माझें दान । हें चि अनुष्ठान नाम तुझें ॥१॥ हें चि माझें तीर्थ हें चि माझें व्रत । सत्य हें सुकृत नाम तुझें ॥ध्रु.॥ हें चि माझा कर्म हाचि माझें धर्म । हाचि नित्यनेम नाम तुझें ॥२॥ हाचि माझा योग हाचि माझा यज्ञ । हें चि तपध्यान नाम तुझें ॥३॥ हाचि कुळाचार हाचि कुळधर्म । हाचि नित्यनेम नाम तुझें ॥४॥ हा माझा आचार हा माझा विचार । हा माझा निर्धार नाम तुझें ॥५॥ तुका म्हणे दुजें सांगायासि नाहीं । नामेंविण कांहीं धनवित्त ॥६॥