भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसार घन घनदाट । कैं होईल शेवट जातीयाचा

sansar ghan ghanadat | kain hoil shevat jatiyacha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संसार घन घनदाट । कैं होईल शेवट जातीयाचा ॥१॥ जीव हेंचि जातें कर्म ह्राचि खुंटा । वोढिती बरवंटा चौघीजणी ॥२॥ जातां वैरू वैरणें जंव आहे लहाणे । जातां जाईजणें जाईल जाणा ॥३॥ एकोत्तरशें कौरव वैरिले वैरणा । यांचा पांडावा जाणा तेंचि झालें ॥४॥ नळनीळ मांधाता वैरियले जातां । निमिष न लागतां पीठ झालें ॥५॥ संसाराचा वोढा वोढितां न वोढे । बैस पैलकडे लावीं हात ॥६॥ नामा म्हणे विठोबा दिनाचें माहेर । सदा पंढरपूर गाऊं गीतीं ॥७॥