भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसार पाल्हाळ सांगती परिकर । नामपाठ सार सिद्धवरी

sansar palhal sangati parikar | namapath sar siddhavari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संसार पाल्हाळ सांगती परिकर । नामपाठ सार सिद्धवरी ॥१॥ न करी आळस नामपाठ गातां । तुटे भवचितां नाना व्याधीं ॥२॥ जनार्दनाचा एका जनार्दन चरणीं । भासे जनीं वनीं जनार्दन ॥३॥