भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसार म्हणसी माझा । कां रे गुंतसी बोजा

sansar mhanasi majha | kan re guntasi boja

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संसार म्हणसी माझा । कां रे गुंतसी बोजा ॥१॥ राहे अलिप्त संसारीं । अंतरीं धरूनियां हरी ॥२॥ तेणें चुकती बंधनें । पावन करिती संतजन ॥३॥ त्रैलोक्यीं ज्याचा शिक्का । एका जनार्दनीं नाम घोका ॥४॥