भजनी मालिका
← भजनांकडे परत

संताचा महिमा देवचि जाणें । देवाची गोडी संतांची पुसणें

santacha mahima devachi janen | devachi godi santanchi pusanen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संताचा महिमा देवचि जाणें । देवाची गोडी संतांची पुसणें ॥१॥ ऐसी आवडी एकमेकां । परस्परें नोहे सुटिका ॥२॥ बहुत रंग उदक एक । यापरी देव संत दोन्ही देख ॥३॥ संताविण देवा न कंठे घडी । उभयतां गोडी एक असे ॥४॥ मागें पुढें नहो कोणी । शरण एका जनार्दनीं ॥५॥