भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांचा वास जये स्थळीं । तेथें रवंदळी पापाची

santancha vas jaye sthalin | tethen ravandali papachi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
संतांचा वास जये स्थळीं । तेथें रवंदळी पापाची ॥१॥ काम क्रोध जाती विलया । ममता माया देशधडी ॥२॥ तृष्णे कल्पनेचा गांव । वोस ठाव संदेहा ॥३॥ निळा म्हणे अहंकारा । मद मत्सरां उरी नुरे ॥४॥