भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिव ऐसा शब्द कल्याणदायक । जाणती भाविक साधुजन

shiv aisa shabda kalyanadayak | janati bhavik sadhujan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शिव ऐसा शब्द कल्याणदायक । जाणती भाविक साधुजन ॥१॥ तारक हें नाम भोळ्याभाविकांसी । नेणते जाणत्यांसी लाभ एक ॥२॥ उपमन्यु बाळक दूध मागों गेला । क्षीरांब्धि दिधला उचितासी ॥३॥ दुष्टदुराचारी पतित तारिले । नाही आव्हेरिलें दीनानाथें ॥४॥ नामा ह्मणे शिव विष्णु एकरूप । ताराया अमूप अवतार ॥५॥