भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदाचिया मतें विसरुनि कीर्तन । करती जे पठण शीण त्यांसी

vedachiya maten visaruni kirtan | karati je pathan shin tyansi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेदाचिया मतें विसरुनि कीर्तन । करती जे पठण शीण त्यांसी ॥१॥ वेदाचा अर्थ न कळेची पाठका । कीर्तनीं नेटका भाव सोपा ॥२॥ श्रुतीचेनी मतें पाहे तो उच्चार । परी सारासारविचार कीर्तनीं ॥३॥ एका जनार्दनीं पुराणाच्या गोष्टी । कीर्तन वाक्पुटीं करा सुखें ॥४॥