भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदाचा वेदार्थ शास्त्राचा शास्त्रार्थ । आमुचा परमार्थ वेगळाची

vedacha vedartha shastracha shastrartha | amucha paramartha vegalachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेदाचा वेदार्थ शास्त्राचा शास्त्रार्थ । आमुचा परमार्थ वेगळाची ॥१॥ श्रुतीचें निजवाक्य पुराणींचे गुज । आमुचें आहे निज वेगळेंची ॥२॥ तत्त्वाचें परमतत्त्व महत्वासी आलें । आमुचें सोनुलें नंदाघरीं ॥३॥ एका जनार्दनीं ब्रह्माडांचा जीव । आमुचा वासुदेव विटेवरी ॥४॥