भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदाचें गव्हर न कळे पाठकां । अधिकार लोकां नाहीं येर

vedachen gavhar na kale pathakan | adhikar lokan nahin yer

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वेदाचें गव्हर न कळे पाठकां । अधिकार लोकां नाहीं येर ॥१॥ विठोबाचें नाम सुलभ सोपेरें । तारी एक सरे भवसिंधु ॥ध्रु.॥ जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ॥२॥ तुका म्हणे विधि निषेध लोपला । उच्छेद या झाला मारगाचा ॥३॥