भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठाबाई म्हणे देहभाव गेले चरण देखीले जेव्हा राजाराम

vithabai mhane dehabhav gele charan dekhile jevha rajaram

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
विठाबाई म्हणे देहभाव गेले चरण देखीले जेव्हा राजाराम ॥१॥ उठवीती मजसी हस्त दोनी धरुनी। स्वामीपासी न्हेती मजसी जाण ॥२॥ मध्यरात्री आलों कार्तिक हो मासी शुद्ध येकादसी जाणावा तो ।।३।। गुरुवारी मध्यरात्रीचे समयासी कुंदगोळ द्वारासी राहिलो ते ।।४।। विदेहाने चरणी लोळु लागले जाण आलींगीती पूर्ण स्वामी मजसी ||५|| देहासी हो मीठी मारीली स्वामीनी। स्वास फुंकती तोंडी देहालागी ||६||