भजनी मालिका

भजने

राधा वनींच्या पुत्रास धन बहुत झालें । तो म्हणे आतां धर्म करीन । बापाचिया श्राद्धा आवंतिले ब्राम्हण । एक जेवण सदामाचें ॥१॥ कैसी नागवण आलीरे बापा । वेंचा परतें पाप आणिक नाहीं ॥ध्रु०॥

रचनाकार: संत नामदेव

राधेप्रती अनया बोले तयेवेळीं । घरांत एकली अससी तूं ॥१॥ एकलें हें तुज कर्मेना मंदिरीं । खेळावया हरी आणीत जाईं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

रानीं वनीं घरीं दारीं । वसतां उच्चारीं हरिनाम ॥१॥ तेणेंचि माया उत्तरोनि घांट । पावसी वैकुंठ सहजवृत्ती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

राम आठवितां नुरेचि पैं पाप । ऐसा दाखव मज पा कोणी एक ॥१॥ नाम त्रिभुवनीं वरिष्ठ साचार । म्हणोनि निर्धार सनकदिकीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

राम कहो जीवना फल सो ही । हरीभजनसुं विलंब न पाई ॥१॥ कवनका मंदर कवनकी झोपरी । एकारामबिन सब हि फुकरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

राम कृपाकर विठ्ठ्ल साकार । दोघे निराकार एकरूप ।। आमुचिये घरीं वस्ति निरंतरीं । हृदयीं एकाकारी राहियेले ।

रचनाकार: संत रामदास

राम कृष्ण ऐसीं उच्चारितां नामें । नाचेन मी प्रेमें संतांपुढें ॥१॥ काय घडेल तें घडो ये सेवटीं । लाभ हाणी तुटी देव जाणे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

राम नाम वदे वाचे । धन्य मुख तयाचें लोटांगणीं साचे । हरिहर पैं येती ॥१॥ नाम चांगलें चांगलें । जड जीव उद्धरले । वैकुंठवासी केलें । कुडे कपाटियासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ