भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामराम उत्तम अक्षरें । कंठीं धरिलीं आपण शंकरें

ramaram uttam aksharen | kanthin dharilin apan shankaren

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रामराम उत्तम अक्षरें । कंठीं धरिलीं आपण शंकरें ॥१॥ कैसीं तारक उत्तम तिहीं लोकां । हळाहळ शीतळ केलें शिवा देखा ॥ध्रु.॥ हाचि मंत्र उपदेश भवानी । तिच्या चुकल्या गर्भादियोनि ॥२॥ जुन्हाट नागर नीच नवें । तुका म्हणें म्यां धरिलें जीवें भावें ॥३॥