भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामनामाच्या प्रतापें । जळती असंख्यात पापें

ramanamachya pratapen | jalati asankhyat papen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रामनामाच्या प्रतापें । जळती असंख्यात पापें ॥१॥ महा दोषांची दोष खाणी । नामें तारिली कुंटनी ॥२॥ नामें तरला अजामेळ । नष्ट गणिका अमंगळ ॥३॥ एका जनार्दनीं नाम । मंगल मंगल तें विश्राम ॥४॥