भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामरूप केली । रामें कौसल्या माउली

ramarup keli | ramen kausalya mauli

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रामरूप केली । रामें कौसल्या माउली ॥१॥ राम राहिला मानसीं । ध्यानीं चिंतनीं जयासी ॥ध्रु.॥ राम होय त्यासी । संदेह नाहीं हा भरवसा ॥२॥ अयोध्येचे लोक । राम झाले सकळीक ॥३॥ स्मरतां जानकी । रामरूप झाले कपि ॥४॥ रावणेसी लंका। राम आपण झाला देखा ॥५॥ ऐसा नित्य राम ध्याय । तुका वंदी त्याचे पाय ॥६॥