भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामनामें नित्य जयासी आनंद । तया ठायीं भेदाभेद नुमटती

ramanamen nitya jayasi anand | taya thayin bhedabhed numatati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रामनामें नित्य जयासी आनंद । तया ठायीं भेदाभेद नुमटती ॥१॥ ऐसे जें रंगले रामनामी नर । चुकवी यमप्रहार जन्मो जन्मीं ॥२॥ धरावी वासना रामनामजप । दुजा तो संकल्प आन नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं नामापरता मंत्र । दुजें नाहीं शस्त्र कलियुगीं ॥४॥