भजनी मालिका
← भजनांकडे परत

याजसाठी केला होता आटाहास्य । शेवटाचा दिस गोड व्हावा

yajasathi kela hota atahasya | shevatacha dis god vhava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
याजसाठी केला होता आटाहास्य । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥ आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥ कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचें तेणें गुणें ॥२॥ तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥३॥