भजनी मालिका
← भजनांकडे परत

याचे पायीं धरिल्या भाव । भेटेल देव निश्चयें

yache payin dharilya bhav | bhetel dev nishchayen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
याचे पायीं धरिल्या भाव । भेटेल देव निश्चयें ॥१॥ नव्हे अन्यथा भाषण । ठावी खूण संतांसी हे ॥२॥ निजकरें कुरवाळून । देईल आलिंगन अत्यादरें ॥३॥ निळा म्हणे येईल दारा । देव सामोरा धांवोनिया ॥४॥