भजनी मालिका
← भजनांकडे परत

याती मतिहीन रूपें लीन दीन । आणीक अवगुण जाणोनियां

yati matihin rupen lin din | anik avagun janoniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
याती मतिहीन रूपें लीन दीन । आणीक अवगुण जाणोनियां ॥१॥ केला त्या विठ्ठलें माझा अंगीकार । ऐसा हा विचार जाणोनियां ॥ध्रु.॥ जें कांहीं करितों तें माझे स्वहित । आली हे प्रचित कळों चित्ता ॥२॥ जालें सुख जीवा आनंद अपार । परमानंदें भार घेतला माझा ॥३॥ तुका म्हणे यासी नामाचा अभिमान। म्हणोनि शरण तारी बळें ॥४॥