भजनी मालिका
← भजनांकडे परत

याची कोठें लागली चट । बहु तट जालेंसे

yachi kothen lagali chat | bahu tat jalense

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
याची कोठें लागली चट । बहु तट जालेंसे ॥१॥ देवपिसीं देवपिसीं । मजऐसीं जग म्हणे ॥ध्रु.॥ एकांताचें बाहेर आलें । लपविलें झांकेना ॥२॥ तुका म्हणे याचे भेटी । झाली तुटी आपल्यांसी ॥३॥