भजनी मालिका
← भजनांकडे परत

यातीकुळ कांहीं नाणी तो मानसीं । धांवें त्यांचे पाठीसी लागवेंगें

yatikul kanhin nani to manasin | dhanven tyanche pathisi lagavengen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
यातीकुळ कांहीं नाणी तो मानसीं । धांवें त्यांचे पाठीसी लागवेंगें ॥१॥ आपुलें म्हणविल्या न देखे पारिखें । रक्षी त्या कौर्तुकें आपुले काजा ॥२॥ एका जनार्दनीं पहा अनुभव । धांवतसे देव लवलाहे ॥३॥