भजनी मालिका

भजने

मेलें जित्यासी सांगे गोष्टी । आंधळें ओंवी सुवर्णाच्या गांठी । पांगुळ लागे पवनाच्या पाठीं । बाळका पोटीं माय वाढे ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

मेल्यावरी मोक्ष संसारसंबंध । आरालिया बद्ध ठेवा आम्हां ॥१॥ वागवीत संदेह राहों कोठवरी । मग काय थोरी सेवकाची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मेळवितांचि हातीं हात । आसुडिले ते अकस्मात । हें देखोनियां लोक समस्त । ठेले विस्मित अवलोकिती ॥१॥ एक एका धरितीं करीं । दाविती चिकाटियाच्या परी । दंडिमुडपी उरीं शिरीं । मारिती धडका परस्‍परें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मेळवीं संवगडे खेळतसे बिन्दी । शोभतसे मांदी गोपाळांची ॥१॥ सांवळां सुंदर वैजयंती हार । चिन्मय परिकर पीतांबर ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मेळवोनि मेळा गोपाळांचा हरी । निघे करावया चोरी गोरसाची ॥१॥ धाकुल सवंगडी घेऊनि आपण । चालती रामकृष्ण चोरावया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मेळेवानि मुलें करावी हे चोरी । पूर्ण अवतारी रामकृष्न ॥१॥ पाळती पाहती एका जाणविती । सर्वे जाऊनी खाती दहींदूधा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मैं ज्यावगी छोरकर तोरे गांवाछे । तूं खोरी मतकर मोरे लालछे ॥१॥ मोरे घर तूं आकर लालछे । माखन चुरावत आपणे हातछे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मैं दधी बेचन मथुरा । तुम केवं थारे नंदजीको छोरा ॥१॥ भक्ति का आचला पकडा हरी । मत खेचो मोरी फारी चुनरीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मोकळा मार्ग पंढरीचा । नाहीं साधन करणें साचा । योग अभ्यासाचा । श्रमाचि नको ॥१॥ जाय जाय पंढरपुरा । पाहे दीनांचा सोयरा । पुंडलिकें थारा । दिधला जाय आवडीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मोकळी गुंते रिती कुंथे नाहीं भार दावें । धेडवाडा बैसली खोडा घेतली आपुल्या भावें ॥१॥ ऐका बाई लाज नाहीं आणिकां त्या गरतीची । समाधानीं उंच स्थानीं जाणे सेवा पतीची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मोकळें तें मन ठेविलें बांधोनी । जनार्दनचरणीं सर्वभावें ॥१॥ स्थिर मति जाली वार्ता तीही गेली । द्वैताची फिटली सर्वसत्ता ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ