भजनी मालिका
← भजनांकडे परत

मेळेवानि मुलें करावी हे चोरी । पूर्ण अवतारी रामकृष्न

melevani mulen karavi he chori | purna avatari ramakrushna

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मेळेवानि मुलें करावी हे चोरी । पूर्ण अवतारी रामकृष्न ॥१॥ पाळती पाहती एका जाणविती । सर्वे जाऊनी खाती दहींदूधा ॥२॥ सांडिती फोडिती भाजन ताकाचें । कवळ नवनीताचे झेलिताती ॥३॥ एका जनार्दनीं नाटकी तो खेळ । न कळे अकळ वेदशास्त्रां ॥४॥