भजनी मालिका
← भजनांकडे परत

मेळवीं संवगडे खेळतसे बिन्दी । शोभतसे मांदी गोपाळांची

melavin sanvagade khelatase bindi | shobhatase mandi gopalanchi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मेळवीं संवगडे खेळतसे बिन्दी । शोभतसे मांदी गोपाळांची ॥१॥ सांवळां सुंदर वैजयंती हार । चिन्मय परिकर पीतांबर ॥२॥ मुगुट कुंडले चंदनाचा टिळा । झळके हृदयस्थळी कौस्तुभमणी ॥३॥ एका जनार्दनीं वेधलेंसे मन । नाही भेद भिन्न गौळणीसी ॥४॥