भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोकळें तें मन ठेविलें बांधोनी । जनार्दनचरणीं सर्वभावें

mokalen ten man thevilen bandhoni | janardanacharanin sarvabhaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मोकळें तें मन ठेविलें बांधोनी । जनार्दनचरणीं सर्वभावें ॥१॥ स्थिर मति जाली वार्ता तीही गेली । द्वैताची फिटली सर्वसत्ता ॥२॥ मोह आशाबद्ध कमी निवारली । पावन तो जालों संतचरणीं ॥३॥ एका जनार्दनीं धन्य संतसेवा । उगविला गोंवा गुंती सर्व ॥४॥