भजनी मालिका
← भजनांकडे परत

मैत्र केला महा बळी । कामा न येती अंतकाळीं

maitra kela maha bali | kama na yeti antakalin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मैत्र केला महा बळी । कामा न येती अंतकाळीं ॥१॥ आधीं घे रे रामनाम । सामा भरीं हा उत्तम ॥ध्रु.॥ नाहीं तरी यम । दांत खातो करकरा ॥२॥ धन मेळविलें कोडी । काळ घेतल्या न सोडी ॥३॥ कामा न ये हा परिवार । सैन्य लोक बहु फार ॥४॥ तंववरी मिरविसी बळ । जंव आला नाहीं काळ ॥५॥ तुका म्हणे बापा । चुकवीं चौर्‍याशींच्या खेपा ॥६॥