भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोक्ष तुमचा देवा । तुम्ही दुर्लभ तो ठेवा

moksha tumacha deva | tumhi durlabh to theva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मोक्ष तुमचा देवा । तुम्ही दुर्लभ तो ठेवा ॥१॥ मज भक्तीची आवडी । नाहीं अंतरीं ते गोडी ॥ध्रु.॥ आपल्या प्रकारा । करा जतन दातारा ॥२॥ तुका म्हणे भेटी । पुरे एक चि शेवटीं ॥३॥