भजनी मालिका
← भजनांकडे परत

मेल्यावरी मोक्ष संसारसंबंध । आरालिया बद्ध ठेवा आम्हां

melyavari moksha sansarasambandh | araliya baddha theva amhan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मेल्यावरी मोक्ष संसारसंबंध । आरालिया बद्ध ठेवा आम्हां ॥१॥ वागवीत संदेह राहों कोठवरी । मग काय थोरी सेवकाची ॥ध्रु.॥ गाणें गीत आम्हां नाचणें आनंदें । प्रेम कोठें भेदें अंगा येतें ॥२॥ तुका म्हणे किती सांगावे दृष्टांत । नसतां तूं अनंत सानुकुळ ॥३॥