भजनी मालिका

भजने

मिथ्या भूतकाया मिथ्या भूतमाया । मिथ्या भूतछाया जेवीं वसे ॥१॥ मिथ्याभूत नाशिवंत जाण । मिथ्याभूत भान सर्व दिसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मिथ्या मायाजाळ मृगजळ बाधा । लागलासे धंदा संसारीया ॥१॥ आलेंरे आलेंरे हाकित टाकित । मूढा गिवसीत काळचक्रीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मिरवी अंगीं अवतार लेणीं । विराजित कीर्ति भूषणीं । मुगुट कंडले कोटी तरणीं । तैसे तेज बंबाळ ॥१॥ कंठी शोभ्ला कौस्तुभमणि । पदकीं चरित्र रत्नाच्या खेवणीं । बाहुभूषणें दिव्याभरणीं । जडित कंकणेसुशोभित ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मिळती गौळणी दारवटीं बैसती । धरुं आतां निश्चिती घरामध्यें ॥१॥ येतो जातो हें न कळे त्यांची माव । वाउगीच हांव धरिताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मिळती सकळां गौळणी ते बाळा । लक्ष लाविती डोळां कृष्णमुखा ॥१॥ धन्य प्रेम तयांचे काय वानुं वाचें । न कळे पुण्य त्यांचे आगमानिगमां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मिळल्या गिपिका यशोदा जवळा । तटस्थ सकळां पाहताती ॥१॥ यशोमाती म्हणे आलेती कासया । वाउगें तें वायां बोलताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मिळवूनि सौंगडे सांगती तयासी । चला गोरसासी देतों तुम्हां ॥१॥ गेली असे एक गौळण जळाळा । सांगे तो गोपाळा तेथें जाऊं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मिळवोनी पांच सात गडी मेळी । डाव खेळती चेंडुफळी ॥१॥ खेळ चेंडुंचाझेला रे झेला बाळा । विचारुन खेळ खेळां न पडुं प्रवाही काळा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मिळालें गोपाळ बैसलें पाळीं । मध्यें वनमाळी विराजला ॥१॥ या रे म्हणती खेळ मांडू । विटीदांडू लगोरीचा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मिळोनि अबळा बैसती परसद्वारी । येरे येरे कृष्णा म्हणोनि बाहाती व्रजनारी ॥१॥ ऐशा लांचावल्या नंदनंदना । घरींच बैसती लक्ष लावीत कान्हा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मिळोनि गोपाळ सकळीं । यमुनेतटीं खेळे चेंडुफळीं । गाई बैसविल्या कळंबातळीं । जाहली दुपारीं खेळतां ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ